|Saturday, October 20, 2018
You are here: Home » leadingnews » यूपीमध्ये खासगी बसचा भीषण अपघात , 16ठार

यूपीमध्ये खासगी बसचा भीषण अपघात , 16ठार 

ऑनलाईन टीम / लखनौ :

उत्तरप्रदेशात खासगी बसच्या अपघतात 16 जणांचा मृत्यू झाला आहे तर 15 हून अधिकजण जखमी झाले आहेत. युपीच्या मैनपूर जिह्यात हा भीषण अपघात झाला आहे.

अपघात झालेली खासगी बस मुजफ्फरपूरहून दिल्लीला जात होती. भरधाव वेगातील बसवरील ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि ती डिव्हायडरला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की त्यानंतर ही बस पलटली आणि यातच 16 जणांचा मृत्यू झाला.या भीषण अपघातात 15 हून अधिकजण जखमी झाले असून अनेकजण गंभीर जखमी आहेत. अपघाताची भीषणता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्मयता आहे.यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातातील प्रवाशांच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त केलं आहे.

 

Related posts: