|Monday, January 21, 2019
You are here: Home » Top News » ‘माझे आर्थिक व्यवहार सेवकाच्या नावे करावेत’; भय्युजी महाराजांची सुसाईड नोटमध्ये नोंद

‘माझे आर्थिक व्यवहार सेवकाच्या नावे करावेत’; भय्युजी महाराजांची सुसाईड नोटमध्ये नोंद 

ऑनलाईन टीम / इंदोर :

अध्यात्मकि गुरु भय्युजी महाराज यांनी मंगळवारी इंदूरमध्ये आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळय़ा झाडून आत्महत्या केली. त्यानंतर सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आपण तणावातून आत्महत्या केली असून त्यासाठी कोणालाही दोषी धरू नये असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे त्यांना कोणते ताणतणाव होते. त्यानंतर नुकतीच आणखी एक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, आपले सगळे आर्थिक व्यवहार आपला सेवक विनायककडे द्यावेत अशी इच्छा भय्युजी महाराज यांनी व्यक्त केली आहे.

भय्युजी महाराज यांनी आपल्या पॉकेट डायरीत ही नोंद केली आहे. विनायक हा भय्युजी महाराज यांच्या अतिशय जवळचा सेवक होता. मागील 15 ते 16 वर्षापासून तो त्यांच्यासोबत होता. त्यांची अनेक कामे करणे तसेच त्यांची काळजी घेण्याचे काम तो करत होता त्यामुळे महाराजांचा त्याच्यावर विश्वास होता. मात्र आपल्या कुटुंबातील व्यक्तींना डावलून महाराजांनी आर्थिक व्यवहार सेवकाकडे द्यावेत अशी इच्छा व्यक्त केल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत. येत्या काळात आणखीही काही गोष्टी समोर येण्याची शक्मयता असून त्यामार्फत त्यांच्या आत्महत्येचे कारण समोर येण्याची शक्मयता पोलिसांनी वर्तविली आहे. कौटुंबिक वाद आणि तणाव हे त्यांच्या आत्महत्येमागील कारण असावे असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Related posts: