|Saturday, October 20, 2018
You are here: Home » Top News » पतीने पत्नीला आणि पोटच्या मुलीला विष पाजून घेतली फाशी

पतीने पत्नीला आणि पोटच्या मुलीला विष पाजून घेतली फाशी 

ऑनलाईन टीम / आर्वी :

विदर्भातील वर्धा जिह्यात आष्टी लहान आर्वी येथे पतीने पत्नीला आणि मुलीला विष पाजून स्वतः फाशी घेतल्याची दुदैवी घटना घडली आहे.

अनिल नारायण वानखडे यानं पत्नी स्वाती अनिल वानखडे, मुलगी आस्था या दोघांसह विष पिऊन नंतर गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वडिलांशी झालेल्या वादातून हे तिघे काल सायंकाळी सात वाजता ते घराबाहेर पडले. त्यानंतर विषारी औषध विकत घेऊन अप्पर वर्धा धरणाच्या परिसरात प्राशन करून झाडाला दोरीने फाशी लावून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

Related posts: