|Monday, January 21, 2019
You are here: Home » leadingnews » प्रभादेवीतील ब्यु मॉन्ड टॉवरमध्ये आग

प्रभादेवीतील ब्यु मॉन्ड टॉवरमध्ये आग 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

मुंबईतील प्रभादेवी परिसरातील ब्यु मॉन्ड टॉवरमध्ये मोठी आग लागली आहे. टॉवरच्या 33 व्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. प्रभादेवीतील वीर सावरकर मार्गावरील ब्यूमॉन्ट इमारतीला ही आग लागली आहे. या इमारतीच्या 33 व्या मजल्याला ही आग लागली आहे. 

 आगीची तीव्रता पाहून अग्नीशमन दलाच्या 10 गाड्या आणि 3 वॉटर टँकर घटनास्थळी रवाना झाले आहेत. सध्या आग विझवण्याचे काम सुरु आहे. ही आग कशामुळे लागली याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही. अग्निशमनदलाला या आगीची माहिती दुपारी 2 वाजून 16 मिनिटांनी मिळाली. याच इमारतीत अभिनेत्री दीपिका पदुकोण हीचं घर आणि ऑफिसही असल्याची माहिती मिळते. या इमारतीच्या 26 व्या मजल्यावर दीपिकाचा 4 बीएचकेचा फ्लॅट आहे. हा फ्लॅट तिने 2010 मध्ये 16 कोटी रुपयांत खरेदी केला होता. याशिवाय अनेक उद्योजकांची कार्यालयही या इमारतीत आहे. ब्यूमॉन्ट इमारतीच्या 33 व्या मजल्याला आग लागली असली, तरी फायर ब्रिगेडकडे तेवढ्या उंचीची शिडीच उपलब्ध नाही. त्यामुळे ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागत आहे.

Related posts: