|Monday, January 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मुंबई ते बाली क्रूझ लवकरच सरू होणार : नितीन गडकरी

मुंबई ते बाली क्रूझ लवकरच सरू होणार : नितीन गडकरी 

ऑनलाईन टीम / पणजी :

मुंबईहून लवकरच तुम्हाला समुद्रमार्गे इंडोनेशियाला जाता येणार आहे. कोची आणि अंदमाननिकोबार बेटांमार्गे ही क्रूझ बालीपर्यंत प्रवास करणार आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईबाली क्रूझबाबत काम सुरू असल्याची माहिती दिली. तो गोव्यातील पणजीमध्ये एका कार्यक्रमानंतर बोलत होते. ‘हजारो भारतीय बालीला प्रवास करत असतात. आता ते मुंबईहून क्रूझने प्रवास करतील. हा मोठा पर्यटनाचा आकर्षणबिंदू ठरेल. आपल्या देशातून एक लाख नागरिक सिंगापूरला क्रूझने जातात. क्रूझ टुरिझम वाढवणे हा आपला उद्देश आहेअसेही गडकरिंनी स्पष्ट केले. सी प्लेनबाबत हवाई वाहतूक नियंत्रण प्राधिकरणाकडून नियमावली तयार करण्यात आली आहे. महिन्याअखेरपर्यंत त्याबाबत अंतिम निर्णय होईल, असंही गडकरिंनी सांगितले.

Related posts: