|Thursday, April 18, 2019
You are here: Home » Automobiles » बजाजची स्वस्तात मस्त पल्सर लॉन्च

बजाजची स्वस्तात मस्त पल्सर लॉन्च 

ऑनलाईन टीम / मुंबई :

बजाजच्या चाहत्यांसाठी आणि तमाम बाईक प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. बजाज पल्सर रियर डिस्क व्हेरियंट लॉन्च केल्यावर दोन महिन्यांच्या आतच कंपनीने आणखी एक बाईक बाईकर्सच्या भेटीला आणली आहे. ही बाईक म्हणजे क्लासिक एडिशन असून, पुण्यातील एका शोरूममने दिलेल्या माहितीनुसार या एडिशनची प्राईज ६७,४३७ इतकी आहे. ही रियर ड्रम ब्रेक व्हेरियंटपेक्षा सुमारे ६,६३७ रूपयांनी स्वस्त आहे.

क्लासिक एडिशनमध्ये टँक एक्सटेन्शन आणि बॉडी ग्राफिक्स नाही. मोटारसायकलमध्ये ब्लॅक पेंट स्किम आहे. याशिवाय बाईकमध्ये फारसा बदल नाही. पल्सर क्लासिक १५० मध्ये रियर डिस्क व्हेरियंटप्रमाणेच १४९ सीसी पॉवर एअर कूल्ड, सिंगल-सिलिंडर बीएसआईव्ही इंजिन आहे.त्याची मोटार ८०००rpm मध्ये १४PS आणि ६०००rpm मध्ये १३.४ एनएम टॉर्क देते.

Related posts: