|Friday, August 17, 2018
You are here: Home » Top News » कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अतिरिक्त उपायुक्तांना लाच घेतांना अटक

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अतिरिक्त उपायुक्तांना लाच घेतांना अटक 

ऑनलाईन टीम / कल्याण :

कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त उपायुक्त संजय घरत यांना आठ लाखांची लाच घेतांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेअंतर्गत येणाऱया अनधिकृत बांधकामावर कारवाई करू नये यासाठी संजय घरत यांनी संबंधीतांकडे 42 लाख रूपयांची मागणी केली होती. पण तडजोडीअंती 35 लाख रूपये देण्याचे निश्चित झाले. त्यापैकी पहिला 8 लाखांचा हफ्ता आपल्याच कार्यालयात घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दुपारी 3 च्या सुमारास रंगेहात अटक करण्यात आली आहे. नेहमीच चर्चेत राहणारे आणि वादग्रस्त अधिकारी अशी प्रतिमा असणाऱया घरत यांना पकडल्याची बातमी वाऱयासारखी महापालिकेत तसेच राजकीय वर्तुळात पसरली. घरत हे कल्याण डोंबिवली महापालिकेतील जुने अधिकारी समजले जातात. त्यामूळे महापालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये पत्रकार, राजकारणी आणि इतरांची मोठी गर्दी झाली होती.

Related posts: