|Monday, January 21, 2019
You are here: Home » Top News » राहुल फटांगडे हत्या प्रकरणी आणखी एक आरोपी अटकेत

राहुल फटांगडे हत्या प्रकरणी आणखी एक आरोपी अटकेत 

ऑनलाईन टीम / पुणे :

भीमाकोरेगाव हिंसाचार प्रकरणात राहुल फटांगडेच्या हत्या प्रकरणातील आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी सोलापुरातून 21 वषीय सुरज शिंदेला ताब्यात घेतले आहे.

सोलापूरच्या माढा तालुक्मयातील टेंभुर्णीतून सुरज रणजीत शिंदेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आरोपी पुण्यातील दौड तालुक्मयातील भीमनगरचा मूळ रहिवासी आहे. राहुल फटांगडेच्या हत्येप्रकरणी चार आरोपींची छायाचित्रे राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीने प्रसिद्ध केली होती. एक जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा हिंसाचारात राहुल फटांगडेची हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी अहमदनगरच्या श्रीगोंदा इथून तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता सीआयडीने आणखी चार नव्या आरोपींची छायाचित्रं आणि चलचित्रे जारी केली. या आरोपींबद्दल माहिती देण्याचे आवाहन सीआयडीने केले. विशेष म्हणजे यापूर्वी अटक करण्यात आलेल्या तिघांनीही राहुलची हत्या केल्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला होता. हे तिन्ही आरोपी अहमहनगरमधील आहेत. 10 जानेवारीला दिवसभराच्या कारवाईनंतर पोलिसांनी एकूण आठ जणांना अटक केली होती. त्यात राहुल फटांगडेच्या हत्येप्रकरणी तिघांना तर उर्वरित पाच जणांना सणसवाडीतल्या हिंसाचाराप्रकरणी अटक करण्यात आली होती. 11 जानेवारीपर्यंत या संपूर्ण प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या 51 वर पोहोचली होती.

Related posts: