|Monday, January 21, 2019
You are here: Home » उद्योग » टेलिकॉमच्या नवीन योजनांना जुलैअखेर मंजुरी : मनोज सिंन्हा

टेलिकॉमच्या नवीन योजनांना जुलैअखेर मंजुरी : मनोज सिंन्हा 

नवी दिल्ली

 टेलिकॉम क्षेत्रामध्ये नवीन योजनांना जुलैअखेर केंद्रीय मंत्रालयाकडून मंजुरी मिळणार असल्याची माहिती मंगळवारी सादर करण्यात आली, मागील चार वर्षांत मंत्रालयाकडे प्रलंबित असणाऱया योजनांना अंतिम मंजुरी मिळणार असल्याचा विश्वासही यावेळी केंद्रीय दुरसंचार मंत्री मनोज सिंन्हा यांनी व्यक्त केला आहे.

नॅशनल डिजिटल कम्युनिकेशन पॉलिसी (एनडीसीपी) या योजनांवर सरकारने सन 2009-2014 या कालावधीत 9 हजार कोटी खर्च करण्यात आला आहे. या खर्चात वाढ होऊन सन 2014-2019 पर्यत 60 हजार कोटी पर्यत होणार असल्याचा अंदाज एनडीसीपीने आपल्या अहवालातून सादर कले आहे.

योजनेच्याअंतर्गत प्रत्येक कुंटुबाला 50 एमबीपीएस इंटरनेट उपलब्ध करुन देण्याची सुविधा देण्यात येणार आहे. टेलिकॉमच्या क्षेत्रात जवळपास 6 लाखा कोटींपेक्षा जादा गुंतवणूक करण्यात येणार असून भविष्यात 40 लाख नोकऱयां निर्माण करण्यात येणार आहेत. याच्याकरीता रिर्झव्ह बँकेतर्फे 650 पोस्ट पेमेंन्ट बँक सुरु करण्यात येणार असून त्यांची जोडणी दीड लाख पोस्ट कार्यालयांमध्ये करण्यात येणार आहे. यातून बँकिंगचे जाळे पसरवण्यास मदत होणार असल्य ाचेही सांगण्यात आले.

Related posts: