|Monday, April 22, 2019
You are here: Home » उद्योग » बँकेच्या सर्व शाखांचे लेखापरीक्षण अशक्य

बँकेच्या सर्व शाखांचे लेखापरीक्षण अशक्य 

नवी दिल्ली

 बँकिंग क्षेत्र मागील काही कालावधीपासून चर्चेत राहीले आहे. पंजाब नॅशनल बँकेचा 13 हजार कोटीचा घोटाळा व त्याच बरोबर आयसीआसीआय बँकेच्या सीईओ च्ंादा कोचर यांच्यावर करण्यात आलेले आरोप व त्याची चौकशी या सर्व घडामोडीमुळे बँकिंग क्षेत्र चर्चेत राहीले आहे. भारतीय रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाने देशातील बँकांच्या सर्व शाखाचे  लेखापरीक्षण करणे अशक्य असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बँकांनी आपले व्यवहार पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. रिर्झव्ह बँकेकडून एक लाखाहून जादा शाखाचे लेखापरीक्षण करण्यात येणे शक्य नसल्याचे मत भारतीय रिर्झव्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी व्यक्त केले आहे. सार्वजनिक क्षेत्रांमध्ये बँकांचा कारभार सुरळीत चालण्यासाठी काटेकोर नियमावली, व त्यांची अंमलबजवणी करण्यासाठी अधिकारी वर्गाची भरती करण्यात येण्याचीही मागणी अर्थमंत्रालयाकडे करण्यात आली.

बँकांच्या अधिकाऱयांना व कार्यकारी मंडळाच्या सदस्यांना कमी करण्याची परवानगी वित्तमंत्रालयाला आहे. तो अधिकार वित्तमंत्रालयाकडे असल्याच्या    चर्चेवरुन आरबीआय आणि वित्त मंत्रालय यांच्यात आणखीन वाद चालू होण्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे. आरबीआयने सांगितलेल्या माहितीनूसार काही बँका बँकिंग कायद्याच्या अंतर्गत येत नसल्याचेही उघड झाले आहे.

आर्थिक वर्ष 2017-2018 भारतीय स्टेट बँकेसह देशभरातील एकूण 21 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची नावे बँकिंग घोटाळय़ात आहेत. यात एकूण 87 हजार 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. पंजाब नॅशनल बँकेला 12 हजार कोटीचा घोटाळा झाला होता. इंडियन बँक आणि विजया बँक यांनाच चालू आर्थिक वर्षात फायदा झाला आहे. त्यामुळे भविष्यातलि बँकिंग क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी बँकांचे व त्याचा शाखा कार्यालयाचे लेखापरीक्षण करण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे.

Related posts: