|Monday, January 21, 2019
You are here: Home » उद्योग » नफा कमाईमुळे शेअरबाजारांमध्ये उदासिनता

नफा कमाईमुळे शेअरबाजारांमध्ये उदासिनता 

आणखी काही दिवस बाजारांमध्ये अनिश्चितता राहणार

वृत्तसंस्था/ मुंबई

बुधवारी बाजारात नफा मिळवण्याचे दिसून आले. दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्स वरच्या पातळीवर पोहचत 150 वर घसरण झाली तर त्यावेळी निफ्टी 40 अंकाच्या जवळपास पोहचत बाजारातील उच्चांकीचा दर गमावला आहे. दिवसभरात  वरच्या स्तरावर बाजारात घसरण झाल्याचे दिसून आले.

दिवसभराच्या व्यवहारात निफ्टी 10,893.25 पर्यत पोहचला असताना, सेन्सेक्स 35,877.4 वर राहिला होता. बाजाराच्या शेवटच्या क्षणी 10,860 जवळ जात बंद झाला. तर सेन्सेंक्स 35,750 च्या खाली घसरला होता.

बुधवारी मिडकॅप समभागामध्ये वातावरण काहीसे समधानाचे राहिले नाही. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.5 टक्कय़ांनी घसरण होत, 16,077.5 वर बंद झाला आहे तर बाजारात बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 16.249 वर पोहचला होता. आणि निफ्टी चा मिडकॅप 100 निर्देशांकासह 0.25 टक्क्यांची घसरण दिसून आली. बीएसईचा स्मॉलकॅपमध्ये निर्देशाकात 0.25 टक्कय़ानी कमजोर होत 17,029 वर पोहचत बंद झाला. तर दिवसभरातील व्यवहारात स्मॉलकॅपचा निर्देशअंक 17,170 पर्यत पोहचला होता.

बीएसईच्या प्रमुख 30 समभागांमधील निर्देशाक सेन्सेकस 47 अंकाची वाढ होत 0.15 टक्कय़ांची वाढ होत. निर्देशाक 35,739 वर बंद झाला. तर एनसईच्या 50 मुख्य समभागांमध्ये निर्देशाकातील निफ्टी 14 अंकानी म्हणजेच 0.15 टक्केची उच्चाकी घेत 10,857 वर बंद झाला आहे.

बाजारात एफएमसीजी , धातू, व्यापार  आणि वीज निर्मिती यांच्या समभागामध्ये दबावाचे वातावरण दिसून आले. तर पीएसयु बँक, आयटी, फार्मा आणि इतर समभागामध्ये चांगली खरेदी झाल्याचे दिसून आले. र्बंकिंगच्या निफ्टीत 0.15 टक्कय़ांची वाढ होत निर्देशाक 26,643 च्या जवळ जात बंद झाला. 

दिग्गज समभागात डॉ.रेड्डीज, सिप्ला, टीसीएस, ल्युपिन, हिडाल्को, एसबीआय 3-1.4 टक्केची उसळी घेत बंद झाला. तर भारती एअरटेल , एचयुआय, आणि इंडसइन्ड बँक यांच्या समभागात 2.1-0.7 टक्क्यांची घसरण होत बंद झाला.

Related posts: