|Monday, October 15, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मालवाहू जहाजातील 60 कंटेनर समुद्रात आग

मालवाहू जहाजातील 60 कंटेनर समुद्रात आग 

ऑनलाईन टीम / कोलकाता :

एमव्ही एसएसएल कोलकाता या मालवाहू जहाजाला समुद्रात आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाने आयसीजीएस राजकिरण हे जहाज आणि डॉर्निअर हे विमान कर्मचाऱयांच्या बचावासाठी रवाना केले आहे.

पश्चिम बंगालच्या हल्दयापासून सुमारे 60 नॉटिकल्स माईल्स अंतरावर हे जहाज होतं. जहाजाच्या डेकवर बुधवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास कंटेनरचा स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली. आतापर्यंत या जहाजावरच्या 22 क्रू मेंबरपैकी 11 क्रू मेंबर्सना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश आलं आहे. इतर क्रू मेंबरना वाचवण्याचे तटरक्षक दलाचे प्रयत्न सुरु आहेत. कोलकात्याच्या श्रेयस लॉजिस्टिक्स या कंपनीचं हे जहाज आहे. हे जहाज पारादीप, विशाखापट्टणममार्गे कोलकात्याला निघालं होतं. जहाजात कच्च्या तेलाचे 464 कंटनेर असून यातील 60 कंटेनरला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. मात्र जोरदार वाऱयामुळे ही आग भडकत आहे. तर बदलत्या हवामानामुळेही बचाव अभियानात अडचणी येत आहेत. आगीत जवळपास 70 टक्के जहाज जळून खाक झालं आहे. ह्या जहाजाला शक्मय तेवढी मदत पोहोचवली जात आहे. तटरक्षक दलाच्या चार मोठय़ जहाजांद्वारे बचावकार्य सुरू आहे. आग विझवण्यासाठी विशाखापट्टणममधूनही एक जहाज रवाना केलं आहे.

Related posts: