|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » Top News » बिबटय़ाच्या हल्ल्यात दोन चिमुकल्यांचा मृत्यू

बिबटय़ाच्या हल्ल्यात दोन चिमुकल्यांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / देहराडून :

गावातील लहान मुलावर बिबटय़ाने हल्ला केल्याच्या कारणातून ग्रामस्थांनी जंगलंच पेटवून दिल्याचा प्रकार उत्तराखंडमध्ये घडला आहे. मागील तीन महिन्यातील ही दुसरी घटना आहे.

उत्तराखंडमधील बागेश्वर गावातील एका 8 वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला, ज्यात चिमुकल्याला आपला जीव गमावावा लागला. चिडलेल्या ग्रामस्थांनी बिबटय़ाला संपवण्यासाठी गावाशेजारील जंगलच पेटवले. सोमवारी संध्याकाळी नैसर्गिक विधी करण्यासाठी हा मुलगा घराशेजारी गेला होता. चिमुकल्याची आई स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. याचवेळी बिबटय़ाने लहानग्यावर हल्ला केला आणि त्याला जंगलात ओढून नेले. गावकऱयांनी रात्री उशिरापर्यंत मुलाचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. दुसऱया दिवशी सकाळी त्याचे अर्थं खाल्लेल शरीर सापडले आहे. चिडलेल्या 4 ते 5 हजार ग्रामस्थांनी आठ एकरावरील जंगलालाच पेटवले. आग विझवण्यासाठी कुणाला प्रयत्न करताही आले नाहीत कारण ग्रामस्थांनी बाहेरच्यांना गावात प्रवेश करण्यास मज्जाव केला. याच बिबट्याने मार्च महिन्यात चार वर्षांच्या चिमुकल्याचा जीव घेतल्याचा दावाही ग्रामस्थांनी केला. तीन महिन्यातील सलग दुसरी घटना असल्यामुळे ग्रामस्थांनी जंगलालाच आग लावली. दरम्यान या बिबटय़ाला वनविभागाने नरभक्षक घोषित केले असून त्याला ठार मारण्यासाठी आदेशही देण्यात आले आहेत.

Related posts: