|Sunday, February 17, 2019
You are here: Home » Top News » कोणत्याही हिंसेला विकास हेच उत्तर : मोदी

कोणत्याही हिंसेला विकास हेच उत्तर : मोदी 

ऑनलाईन टीम / रायपूर :

कोणत्याही प्रकारच्या हिंसेला विकास हेच उत्तर असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्तीसगडमध्ये केले. यावेळी त्यांनी राज्यातील नक्षलवादाविषयी चिंत व्यक्त केली आहे. नक्षलवाद हा विकासानेच दूर होऊ शकतो, असा विश्वास यावेळी मोदींनी व्यक्त केला. मोदी आज छत्तीसगडच्या दौऱयावर असून त्यांच्याकडून विविधन प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येत आहे.

 

‘कोणत्याही प्रकारच्या हिंसेला विकास हेच उत्तर असू शकतं, असा विश्वास मला वाटतो. विकासामुळे निर्माण झालेल्या विश्वासामुळे सर्व प्रकारची हिंसा दूर सारली जाऊ शकते,’ असं मोदींनी छत्तीसगडमध्ये आयोजित केलेल्या रॅलीला संबोधित करताना म्हटलं. छत्तीसगडमध्ये वर्षाच्या अखेरीस निवडणूक होत आहे. छत्तीसगडमधील नक्षली कारवायांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना विकासाचं नक्षलवाद्याला उत्तर असू शकतं, असं मोदी म्हणाले.

 

 

 

 

Related posts: