|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » Top News » वसतीगृहातील केअरटेकरकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

वसतीगृहातील केअरटेकरकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

नवी मुंबई येथील कळंबोली येथिल वसतीगृहातील तीन केअरटेकरवर अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 11, 12 आणि 17 वर्षाच्या तीन मुलांसोबत हा लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे.

कळंबोली पोलिसांनी सोमवारी रात्री दोन केअरटेकरना अटक केली आहे. तिसरा केअरटेकर उन्हाळय़ाच्या सुट्टीसाठी आपल्या घरी गेला होता, तो अद्याप परतलेला नाही. मुलांच्या आईवडिलांचा नालासोपाऱयात फुलांचा व्यवसाय असून इतक्मया सगळय़ांचं पोट भरणं त्यांना शक्मय नव्हतं. त्यामुळे त्यांनी तिन्ही मुलांना जे चुलत भाऊ आहेत त्यांना कळंबोलीमधील वसतीगृहात पाठवलं. विक्रोळीमधील एक धर्मादाय ट्रस्ट हे वसतीगृह चालवतं. वसतीगृहात फक्त मुलांच्या राहण्याची सोय केली जात नसून त्यांचा शिक्षणाचाही खर्च केला जातो. पीडित मुलं कळंबोलीमधील एका खासगी शाळेत शिकत होती. यामधील 17 वषीय मुलाला ऐकण्याचा त्रास आहे. मुले सुट्टीसाठी घरी परतल्यानंतर आश्रमात पुन्हा परत जाण्यास नकार देऊ लागल्यानंतर ही घटना उघडकीस आली. ‘जेव्हा त्यांच्या पालकांनी आश्रमात पुन्हा का जाणार नाही अशी विचारणा केली तेव्हा मुलांनी फेब्रुवारी महिन्यापासून केअरटेकर आपल्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत असल्याचं सांगितले’, अशी माहिती वरि÷ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांनी दिली आहे.

Related posts: