|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » Top News » विहिरीत पोहल्याने जळगावात तिघा मुलांना नग्न करून मारहाण

विहिरीत पोहल्याने जळगावात तिघा मुलांना नग्न करून मारहाण 

ऑनलाईन टीम / जळगाव :

विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दलित समाजातील तीन मुलांना नग्न करून अमानुष मारहाण केल्याची घटना जळगाव जिह्यात जामनेर तालुक्मयातील वाकडी गावात घडली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासल्या गेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी दहा जून रोजी घडल्याचे समोर आले आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. दोघा आरोपींना अटक केल्याची माहिती सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे यांनी दिली आहे. जळगावात जामनेर तालुक्मयातील वाकडी गावात राहणारी तीन मुले आरोपीच्या विहिरीत पोहण्यासाठी गेली होती. हा प्रकार समजताच आरोपींनी तिघांना नग्न करून त्यांना अमानुष मारहाण केली. इतकेच नाही, तर त्यांची गावात धिंड काढण्यात आली आणि शेतातील खोलीत अमानुषपणे मारहाण झाल्याचे उजेडात आले आहे. या संदर्भात पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. मात्र आरोपीकडून फिर्याद माघारी घेण्यासाठी पीडित कुटुंबियांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ‘आम्हाला या गावात राहायचे आहे’ असे सांगत पीडितांच्या कुटुंबीयांनीही तक्रार नोंदवण्याबाबत टाळाटाळ केल्याचे म्हटले आहे.

Related posts: