|Sunday, February 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » भर दिवसा गोळीबार आणि लाखोंच्या बनावट नोटा

भर दिवसा गोळीबार आणि लाखोंच्या बनावट नोटा 

प्रतिनिधी /सातारा :

जिल्हय़ातील गुन्हेगारी विश्वाला मोक्काचा दणका देत नेस्तानाबूत करणारऱया जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांच्या धडक कारवाईमुळे गुन्हेगारीला लगाम बसतोय असे वाटत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी साताऱयात भर दिवसा युवकाने केलेला गोळीबार, मंगळवार पेठेत झालेली युवकाची हत्या आणि आता चक्क बनावट नोटा तयार करण्यातही युवकांचा सहभाग समोर येत आहे. गुन्हेगारीतील युवकांचा सहभाग हा सातारऱयाच्या शांतताप्रिय संस्कृतीला छेद देणाराच आहे. हे आव्हान फक्त पोलीस दलासमोर आहे असे नव्हे तर ते प्रत्येक कुटुंब व सर्व समाजासमोर उभे आहे.

सातारा म्हटलं की निसर्गरम्य परिसरात वसलेला आणि मराठा साम्राज्यांची राजधानी असलेले प्रमुख ठिकाण. हा इतिहासाचा वारसा आणि भारतीय स्वातंत्र्य लढय़ातील क्रांतीकारकांच्या प्रतिसरकारचा प्रेरणादायी इतिहास जगाला देणारा सातारा जिल्हा. मात्र, जिल्हय़ाचे ठिकाण असूनही अद्याप अविकसितपणाचा शिक्का अंगावर मिरवणाराही सातारा. गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी प्रवृत्तींच्या विळख्यात अडकत चालला आहे. खासगी सावकारी, खंडणी, जमीन हडपाहडपी, खुनाचे प्रकार अशा घटनांना, त्यातील सहभागी गुन्हेगारी प्रवृत्तींना राजकीय पाठबळ, गतवर्षी टोलनाक्यावरुन थेट लोकप्रतिनिधींच्या सहभागाने कोजगिरीच्या चांदण्यात झालेला गोळीबार, गाडयांची फोडाफोडी या घटनांनी शांतताप्रिय सातारकर हादरुन गेले होते. या घटना घडत असतानाच जिल्हय़ाला लाभलेले धडाकेबाज जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी कायदा किती श्रेष्ठ असतो हे दाखवताना सातारा जिल्हय़ातील भयमुक्त करण्यासाठी गुंडापुंडाच्या टोळय़ांवर, खासगी सावकारांवर मोक्काची कारवाई केली. त्यांची दहशत मोडून काढण्यात पोलीस दल यशस्वी ठरल्याने नागरिकांच्या मनातही पोलिसांविषयी आदर निर्माण झालेला आहे.

Related posts: