|Sunday, February 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » बनावट नोटा तयार करणाऱया टोळीचा सातारा पोलिसांकडून पर्दाफाश

बनावट नोटा तयार करणाऱया टोळीचा सातारा पोलिसांकडून पर्दाफाश 

प्रतिनिधी /सातारा :

भारतीय चालनातील 2 हजार आणि 500 रुपयाच्या बनावट नोटा छापणाऱया टोळीचा पर्दाफाश सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केला आहे.  मुख्य सूत्रधार गणेश भोंडवे याच्यासह 6 ओरोपीना गजाआड करण्यात  सातारा पोलिसांनी यश मिळवले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, बनावट नोटाचे कनेक्शन सांगली जिह्यातील मिरज तालुक्यापर्यंत पोहोचले असल्यामुळे हे रॅकेट पश्चिम महाराष्ट्रात तळागाळा पर्यंत पोचले आहे की काय असा संशय ही त्यांनी व्यक्त केला. याबाबत पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एकूण 56 लाख 42 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा व त्या तयार करण्यासाठी लागणारी सामग्री पोलिसांनी जप्त केली आहे.

    मिरज पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी गोस गब्बर मोमीन याला बनावट नोटा विकताना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर साताऱयातील शुभम खामकर या त्याच्या वर्गमित्राने त्याला या नोटा विक्रीसाठी दिल्या होत्या अशी माहिती त्याने मिरज ग्रामीण पोलिसांना दिली होती. त्यानुसार मिरज ग्रामीण पोलिसांनी सातारा पोलिसांशी संधान साधून शुभम खामकारला ताब्यात घ्या, असे सांगितले. त्यानुसार सातारा गुन्हे अन्वेशन विभागाने शुभम खामकरला अटक केली.  तपासाची सारी सूत्रे हातात घेत सातारा गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाला दिशा घेऊन वेग घेतला पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अनकेत प्रमोद यादव, रा. नवीन एमआयडीसी, व अमोल अर्जुन शिंदे, रा. गडकर आळी, सातारा हे दोघेजण कोटेश्वन मंदिराच्या परिसरात रहात असून सातारा परिसरात दोन मोटार सायकलवरून फिरून भारतीय चलनातील दोन हजार व पाचशे रूपयांच्या छपाई केलेल्या बनावट नोटा चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहा. पो. नि. विकास जाधव यांच्या अधिपत्याखाली एक पथकाची नियुक्ती करून दोन इसमांवर लक्ष ठेवून त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले. 

Related posts: