|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मंगळावर धूळयुक्त वादळ, नासाचे रोव्हर पडले बंद

मंगळावर धूळयुक्त वादळ, नासाचे रोव्हर पडले बंद 

न्यूयॉर्क :

मंगळ ग्रहावरील भीषण धूळयुक्त वादळामुळे नासाचे ऑपॉर्च्युनिटी रोव्हर ठप्प पडले आहे. धुळीच्या वादळामुळे सौरऊर्जेने चालणारे हे मानवरहित यान शटडाउन मोडमध्ये गेले असून पूर्ण यंत्रणा ठप्प पडल्याने याच्या अस्तित्वाबद्दलच्या चिंता वाढल्याचे अमेरिकेच्या अंतराळ संस्थेने म्हटले.

अचानक आलेल्या धूळयुक्त वादळामुळे लाल ग्रहापर्यंत सूर्यकिरणे पोहोचू शकली नाहीत. सुमारे 1.4 कोटी चौरस मैल क्षेत्रात पसरलेल्या भाग धूळीच्या लोटांनी आच्छादला गेला आहे. ऑपॉर्च्युनिटीला मंगळ ग्रहावर परसीवरन्स व्हॅली नावाच्या ठिकाणी पाहण्यात आले. वादळ थांबण्याची आम्ही प्रतीक्षा करत असल्याचे विधान रोव्हरचे प्रकल्प व्यवस्थापक जॉन कालास यांनी केले. आम्हाला रोव्हरबद्दल चिंता असली तरीही वादळ संपल्यावर रोव्हरशी संपर्क साधण्यास यश येईल, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले.

30 मे रोजी वादळाची कल्पना आली होती आणि पुढील काही दिवसांमध्ये त्याची तीव्रता वाढतच गेली. रोबोटिक यानाशी अखेरचा संपर्क 10 जून रोजी झाला होता. मंगळावरील जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी अपॉरच्युनिटी आणि स्पिरिट नावाची दोन याने 2003 मध्ये प्रक्षेपित करण्यात आली होती. एक वर्षानंतर दोन्ही याने मंगळावर पोहोचली होती.