|Sunday, February 17, 2019
You are here: Home » Top News » सर्व प्रकारच्या हिंसेला विकासच उत्तर : मोदी

सर्व प्रकारच्या हिंसेला विकासच उत्तर : मोदी 

वृत्तसंस्था /भिलाई :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगढमध्ये आयआयटी समवेत 22000 कोटींच्या विकासप्रकल्पांचा गुरुवारी शुभारंभ केला. मोदींनी येथील एका सभेला संबोधित करताना नक्षलवाद्यांना थेट संदेश देखील दिला. सर्वप्रकारच्या हिंसा आणि कटाला विकासच उत्तर असल्याचे पंतप्रधान यांनी विधान केले. पंतप्रधानांनी भिलाई येथील स्टील प्रकल्पाची पाहणी देखील केली.

विक्रमी संख्येत तरुणाई विकासाशी, देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडली जात आहे. कोणत्याही प्रकारचा हिंसाचार, सर्वप्रकारच्या कटांना विकासच उत्तर असल्याचे मी मानतो. विकासामुळे विकसित झालेला विश्वास सर्वप्रकारचा हिंसाचार संपवितो. पेंद्र तसेच राज्य सरकारने विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. स्टील प्रकल्पाचा विस्तार, जगदलपूर विमानतळ  आणि नव्या रायपूरच्या एकीकृत नियंत्रण कक्षाचे लोकार्पण झाले. भिलाईमध्ये आयआयटीचे टप्प्याचे काम सुरू होत असल्याचे मोदी म्हणाले.

अंतर झाले कमी

आमच्या सरकारने जल, भूमी आणि नभाशी जोडण्याचा गतिमान प्रयत्न केला आहे. जगदलपूरहून रायपूरसाठी विमानसेवा सुरू झाली आहे. जगदलपूरहून रायपूरचे अंतर 6 ते 7 तासांऐवजी आता 40 मिनिटांवर आले आहे. रेल्वेतील एसी डब्यांपेक्षा विमानातून अधिक प्रवास केला जातोय. या सर्व सुविधांमुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचा दावा मोदींनी केला.

पहिली ग्रीनफील्ड स्मार्टसिटी

नवे रायपूर शहर देशातील पहिली ग्रीनफील्ड स्मार्टसिटी ठरली आहे. शहराच्या एकीकृत नियंत्रण कक्षाच्या उद्घाटनाचे मला सौभाग्य मिळाले. नवे रायपूर आता अन्य स्मार्टसिटींसाठी उदाहरण ठरणार आहे. जंगलांमुळे ओळख राहिलेले छत्तीसगढ आता स्मार्टसिटींच्या रांगेत असून ही अभिमानाची बाब असल्याचे उद्गार मोदींनी काढले.

 

 

 

 

Related posts: