|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » क्रिडा » फेडररचा विजय, नादालची माघार

फेडररचा विजय, नादालची माघार 

वृत्तसंस्था /स्टुटगार्ट :

येथे सुरू असलेल्या स्टुटगार्ट खुल्या पुरूषांच्या एटीपी टेनिस स्पर्धेत स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने शानदार विजय मिळवित पुढील फेरी गाठली. तर पुढील आठवडय़ात सुरू होणाऱया क्विन्स क्लब पुरूषांच्या एटीपी टेनिस स्पर्धेतून प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम विजेता 32 वर्षीय राफेल नादालने दुखापतीमुळे माघार घेतली आहे.

स्टुटगार्ट टेनिस स्पर्धेत बुधवारी स्वित्झर्लंडच्या फेडररने जर्मनीच्या मिश्चा व्हेरेव्हचा 3-6, 6-4, 6-2 असा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश मिळविला. या लढतीत फेडररला पहिला सेट गमवावा लागला. फेडररने आतापर्यंत आठ वेळा विंबल्डनचे जेतेपद मिळविले असून पुढील महिन्यात लंडनमध्ये सुरू होणाऱया विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतील नवव्यांदा विजेतेपद मिळविण्यासाठी 36 वर्षीय फेडरर प्रयत्न करेल.

पुढील आठवडय़ात सुरू होणाऱया क्विन्स क्लब ग्रॉस कोर्ट टेनिस स्पर्धेतून 32 वर्षीय राफेल नादालने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. 2008 साली नादालने ही स्पर्धा जिंकली होती. नादाल आता विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेपूर्वी पूर्ण तंदुरूस्त राहण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

Related posts: