|Sunday, February 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » स्वाक्षरी, हस्ताक्षरावरून ओळखता येतो मानवी स्वभाव!

स्वाक्षरी, हस्ताक्षरावरून ओळखता येतो मानवी स्वभाव! 

प्रसाद सु. प्रभू /बेळगाव :

मानवी स्वभाव आणि त्यामध्ये दडलेले विविध पैलू यांचा शोध घेणे तसे अवघडच. वेगवेगळय़ा शास्त्रातील तज्ञ, वेगवेगळय़ा गोष्टींवरून एखाद्या व्यक्तिचा स्वभाव तंतोतंत सांगता येतो, असा दावा करतात आणि तसे सिद्धही करून दाखवितात. तेव्हा थक्क व्हायलाच होते. असेच एक हस्ताक्षर विद्या व विश्लेषण तज्ञ बेळगावात आहेत. अनेक वर्षे अभ्यास आणि सरावाच्या जोरावर त्यांचा दावा आहे की एखाद्या व्यक्तिची स्वाक्षरी किंवा त्याच्या हस्ताक्षराच्या नमुन्यावरून त्या व्यक्तिचा स्वभाव आणि इतर अनेक वैशिष्टय़े ओळखता येणे शक्मय आहे. इतकेच नव्हेतर हस्ताक्षर आणि स्वाक्षरीच्या पद्धतीत ठरावीक बदल केल्यास स्वभावात बदल घडवून आणता येतात, असेही ते सांगतात.

निरंजन अंबर्डेकर असे या तज्ञाचे नाव आहे. कागद उद्योगात 25 वर्षांहून अधिक काळ काम करत असताना आणि छंद म्हणून चित्र व अक्षरांच्या दुनियेत रमत असताना त्यांना या आगळय़ावेगळय़ा शास्त्राची ओळख झाली. त्यातूनच ते हस्ताक्षर विद्या आणि विश्लेषण शास्त्राकडे वळले. पुणे येथील इन्स्टिटय़ूट ऑफ ग्रॅफोलॉजी ऍन्ड पर्सनल सक्सेसमधून त्यांनी याबद्दलचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. त्यानंतर या शास्त्राचा सराव आणि त्यातून लोकांना मदतीची भावना ते जपत आले आहेत. या संदर्भातील माहिती त्यांनी तरुण भारतला विशेष मुलाखतीच्या माध्यमातून दिली.

Related posts: