|Saturday, May 25, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » तब्बल ८० वर्षानंतर मुलींना ‘या’शाळेत मिळाला प्रवेश

तब्बल ८० वर्षानंतर मुलींना ‘या’शाळेत मिळाला प्रवेश 

ऑनलाईन  टीम / पुणे :
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १९८० मध्ये स्थापन केलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आज ८१ वर्षांनंतर पुन्हा सह-शिक्षणास प्रारंभ झाला आणि नवीन प्रवेश घेतलेल्या मुलींचा शाळेच्या पहिल्या दिवशी पहिला तास पुण्याच्या महापौर आणि टिळक घराण्याच्या सूनबाई मुक्ता टिळक यांनी घेतला. 
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये १९३६ पर्यंत विद्यार्थिनींना प्रवेश दिल्याच्या नोंदी आढळतात. त्यानंतर ८१ वर्षे या शाळेत फक्त  विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थिनींना प्रवेश देऊन सह-शिक्षण सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनाने घेतला. या ऐतिहासिक घटनेच्या तुम्ही सार्‍या जणी घटक आहात,  झाशीची राणी लक्ष्मीबाईप्रमाणे पराक‘मी व्हा, अशा शब्दात महापौरांनी विद्यार्थिनींचे स्वागत केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, संचालक सुनील भंडगे, मु‘याध्यापक नागेश मोने यांची प्रमुख उपस्थित होती.   
लोकमान्य टिळक, समाजसुधारक आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, महादेव बल्लाळ नामजोशी या धुरीणांनी १८८० मध्ये नाना वाड्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात वर्गात बेंच नव्हते. मुलांना जमिनीवर बसावे लागायचे. ही जमीन खडबडीत व खड्डेयुक्त होती. शाळा सुरू व्हायच्या आधल्या दिवशी लोकमान्यांनी  वर्गाची स्थिती पाहिली. मुलांची गैरसोय व्हायला नको म्हणून स्वतः खड्डे बुजवून जमीन शेणाने सारवून घेतली. ही आठवण सांगून या धुरीणांची दूरदृष्टी आणि त्यांनी घेतलेल्या अपार कष्टांमुळेच आज हे शैक्षणिक वैभव पाहायला मिळत आहे, असे मत महापौर टिळक यांनी व्यक्त केले.

Related posts: