|Thursday, August 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » बिशपादिकांचे लैंगिक दुर्वर्तन

बिशपादिकांचे लैंगिक दुर्वर्तन 

दक्षिण अमेरिका खंडातील चिली या देशातील 3 बिशपांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप सिद्ध झाल्यामुळे पोपकडे राजीनामे देण्याची घटना नुकतीच घडली.
याप्रकरणी चिलीमधील चर्चच्या अधिकाऱयांनी जबाबदारीचे वर्तन केले नाही असा अभिप्रायही पोप फ्रान्सिस यांनी †िदला. त्यानंतर चिलीमधील 34 वरिष्ठ धर्माधिकाऱयांनी राजीनामे देण्याची तयारी दर्शवली. गेला आठवडाभर या घटनेची वृत्ते पाश्चात्य देशातील सर्व वृत्तपत्रातून येत राहिली.

चर्च या संस्थेतील अधिकारी बालकांवर लैंगिक अत्याचार करत असल्याच्या बातम्या काही आजच प्रसिद्ध झाल्या नाहीत. यापूर्वी अनेक वर्षे त्या प्रसिद्ध होत राहिल्या. ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च वरिष्ठ पोप असतात. व्हॅटिकन सिटी या इटलीची राजधानी रोमच्या मध्यभागी वसलेल्या स्वतंत्र सार्वभौम देशातून ते ख्रिस्ती धर्माच्या व्यवहारांचे कामकाज हाताळतात. विद्यमान पोप फ्रान्सिस यांनी आपल्या धर्मासनावर आरुढ होताना ‘लैंगिक अत्याचारांच्या आरोपांमुळे धर्मसंस्थेची प्रतिमा डागाळत आहे आणि यात लक्ष घालणे हे माझे महत्त्वाचे कार्य असेल’, असे म्हटले होते. त्यांच्या साडेपाच-सहा वर्षांच्या कारकिर्दीत या प्रकारांची उकल होणे सुरू झाले आहे.

लैंगिक अत्याचारांचे प्रकार रोजच कोठे ना कोठे घडत असतात. आपल्या देशात अशा घटनांच्या बातम्या आल्या नाही असा दिवस उजाडत नाही. परंतु एखाद्या धर्मसंस्थेतील वरिष्ठ अधिकाऱयांकडून असे अत्याचार घडणे आणि सामान्य गुन्हेगारी वृत्तीच्या माणसांकडून घडणे यात फरक आहे. लाखो लोकांच्या आदराचे कारण ठरलेले आणि ज्यांच्या नावामागे ‘रेव्हरंड’ म्हणजे ‘पूज्य’ (आदरणीय या अर्थी) ही उपाधी लावली जाते अशा बिशप, आर्चबिशप आदी धर्माधिकाऱयांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले जाणे हे धक्कादायक आहे, लाजिरवाणे आहे आणि धर्मसंस्था ज्यांनी सांभाळायची त्यांनीच असली कृत्ये केली तर धर्मभावनेचे काय होईल़, असे वाटायला लावणारे आहे.

हा विषय गंभीर अशासाठी की लैंगिक अत्याचाराच्या गुह्यामुळे राजीनामे द्यावे लागणाऱया चिलीमधील तीन बिशपांपुरताच हा विषय मर्यादित नाह़ी त्यांच्यावरील आरोप निर्विवादपणे सिद्ध झाले, परंतु असे घाणेरडे आरोप असलेले आणखी एक दोन नाही तर सगळे मिळून अठ्ठय़ाऐशी धर्माधिकारी जगभर आहेत़ बिशप, आर्चबिशप आणि कार्डिनल यासारख्या अत्युच्च पदांवर ते विराजमान आहेत़ धार्मिक पोषाख करून, उच्च धर्माधिकाराचे चिन्ह असणारी त्रिकोणी टोपी डोक्यावर घालून आणि हातात धर्मदंड घेऊन ते धर्माला कदापि मंजूर न होणारी घृणास्पद कृत्ये करत आहेत़  युरोपातील 13 आणि अमेरिका खंडातील 12 देशांमध्ये लैंगिक गुन्हेगारीला सोकावलेले हे धर्माधिकारी धुमाकूळ घालत आहेत़ ऑस्ट्रेलिया, आशिया आणि आफ्रिका खंडात त्यांचे प्रमाण कमी आह़े

बिशपादिकांच्या या लैंगिक फाजीलपणाचा इतिहासही तसा जुना आह़े 1940 साली अमेरिकेतल्या एक वरिष्ठ धर्माधिकाऱयाने या गुह्याकडे लक्ष देण्याची गरज प्रकट केली होत़ी पोप पॉल सहावे यांच्या कारकिर्दीत (1970 च्या दशकात) व्हॅटिकन या सर्वोच्च धर्मपीठापर्यंत असल्या प्रकारांच्या वार्ता पोहोचल्या होत्य़ा पण त्यावेळी हे प्रकार तुरळक होत़े निदान तसे वाटत होत़े पण विसाव्या शतकात त्यांचे प्रमाण इतके वाढले आहे की ‘बिशप अकौंटेबिलिटी डॉट ऑर्ग’ या बिशपांबद्दलच्या संकेत स्थळावर ‘असल्या कृत्यांचा पायंडाच पडतोय’ अशी भीती व्यक्त केली आह़े

खेदाची गोष्ट अशी की या प्रकारचे आरोप असणाऱया 88 धर्माधिकाऱयांपैकी फक्त 4 जणांवरील दोषारोप सिद्ध होउढन त्यांना शिक्षा ठोठावण्यात आल्य़ा हे आरोप असलेले पवित्र झग्यातले नराधम इतके कोडगे आहेत की चर्चच्या संपत्तीचा गैरवापर वगैरे होत आहे म्हणत तेच आवाज उठवतात़ दक्षिण अमेरिकेच्या मध्यभागी असणाऱया ‘ग्वाम’ या देशातील ऍपुरॉन नावाच्या बिशपाने 2011 मध्ये अशाप्रकारे आवाज उठवला होत़ा परंतु खोलात जाता ऍपुरॉनने स्वतःच आपल्या हाताखालील मुलांचे लैंगिक शोषण केल्याचे स्पष्ट झाल़े मग हे षड्यंत्र आहे वगैरे कांगावा त्याने केल़ा 1965 पासून पंधरा वीस वर्षे त्याने 4 ‘अल्टारबाईज’चे लैंगिक शोषण केले होत़े  शेवटी दोन वर्षांपूर्वी पोप कान्सिस यांनी त्याला सक्तीच्या रजेवर पाठवले, नंतर तो मरण पावल़ा

परंतु व्हॅटिकन या सर्वोच्च धर्मपीठानेही या प्रकारांमध्ये वेळीच लक्ष देण्याची घाई केली नाह़ी यापूर्वेचे पोप बेनेडिक्ट सहावे यांनी या घृणास्पद गोष्टींपासून धर्मसंस्था मोकळी केली पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू केल़े  बिशप वगैरेंना महत्त्वाच्या धर्माज्ञा प्रसृत करणे, न्यायनिवाडे करणे यासारखे अधिकार असतात आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात अनेक देशातील कायदे पुरेसे बळ देत नाहीत़ चर्चमधील अधिकाऱयांकडून होणाऱया असल्या गुह्यांना पायबंद घालण्यात कुचराई करत असल्याबद्दल खुद्द पोप आणि व्हॅटिकनमधील काही कार्डिनलांबद्दल आंतरराष्ट्रीय न्यायालयात 2011 मध्ये तक्रार दाखल करण्यात आल़ी त्यानंतर ‘युनो’नेही व्हॅटिकनबरोबर या प्रकारांसंबंधी चर्चा केल़ी चिलीमध्ये घडलेल्या प्रकरणांची वाच्यता त्यानंतरच़ी

चिलीमध्ये हे होत असल्याच्या तक्रारींची आधी ‘तथ्यहीन’ म्हणून पोपमार्फत बोळवण करण्यात आल़ी पण तिथल्या अधिकाऱयांना दूर सारून बॅरोस नावाच्या बिशपाची प्रतिनियुक्ती झाली तेव्हा नागरिकांनी प्रचंड विरोध केल़ा लहानपणी या अत्याचारांना बळी पडलेल्यांपैकी युवान कार्डोझ प्रुझ नावाच्या 56 वर्षाच्या मनुष्याने चिवटपणे झुंज दिल़ी शेवटी आपल्या चौकशीत त्रुटी राहिल्या म्हणून दिलगिरी व्यक्त करून पोपनी क्षमा याचना केली आणि त्यानंतर दोषी बिशपांचे धर्माधिकार काढून घेण्यात आल़े डागळली जात असलेली धर्मसंस्थेची प्रतिमा सुधारण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल पडल़े

राजेंद्रप्रसाद मसुरकर,  9960245601