|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कुरूंदवाडमध्ये पोलीस ठाण्यामार्फत इफ्तार पार्टीचे आयोजन

कुरूंदवाडमध्ये पोलीस ठाण्यामार्फत इफ्तार पार्टीचे आयोजन 

प्रतिनिधी/ कुरूंदवाड

कुरूंदवाड शहर हे हिंदु-मुस्लिम एwक्याचे प्रतिक आहे. ईद, मोहरम, गणोशोत्सव सणामध्ये सर्व धर्मिक लोक येथे सहभागी होतात, हा एकोपा सर्वांसाठी आदर्शवत आहे, असे प्रतिपादन कुरूंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी केले. पोलीस ठाण्यामार्फत रमजान ईद निमित्त देण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयराम पाटील होते.

यावेळी सलिम बागवान यांनी रमजान महिन्याचे महत्व विषद केले. यावेळी उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, पाणीपुरवठा सभापती फारूख जमादार, नगरसेवक उदय डांगे, पंचायत समिती सदस्या मिनाज जमादार, राष्ट्रसेवा दलाचे बाबासाहेब नदाफ, ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य बंडा माने, शिरढोणचे सरपंच सय्यद मुजावर, लियाकत बागवान, गौस बागवान, सुनिल कुरूंदवाडे, शिवाजी बिडकर, रमजान पकाली, जावेद बागवान, रामचंद्र मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत बांधकाम सभापती सुनिल चव्हाण यांनी केले. आभार पोलीस उपनिरीक्षक आण्णासाहेब शिंदे यांनी मानले.