|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दूध पावडर निर्यातीस अनुदानाची गरज

दूध पावडर निर्यातीस अनुदानाची गरज 

प्रतिनिधी/ सांगली

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरीचे दर घसरले आहेत. दोन वर्षापूर्वी 240 ते 260 रुपये प्रतिकिलो प्रमाणे विकल्या जाणाऱया पावडरचा दर आता 130 ते 140 रुपयेपर्यंत खाली आला आहे. परिणामी दूध पावडर निर्यात होत नसल्याने त्याचा  परिणाम दूध दरावर झाला असल्याचे स्पष्ट करत पावडर निर्यातीसाठी प्रतीकिलो 40 रुपयांचे अनुदान देण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली असल्याची माहिती, कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली.

राज्यात सुमारे 30 लाख लीटर दूध जास्त असल्याचे सांगत खोत म्हणाले, दूधापासून तयार करण्यात येणाऱया पावडरचे उत्पादन कमी झाले आहे. दर नसल्याने निर्यात रखडली आहे. त्याचा परिणाम दूध दरावर झाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे साखर उद्योगाला ज्या प्रमाणे पॅकेज देण्यात आले, त्याप्रमाणे दूध संघानाही दूध पावडर निर्यात करण्यासाठी प्रती किलो 40 रुपये अनुदान देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे दूधाचे भाव वाढण्यास मदत होईल

‘बॅन’ औषधे विकणाऱयांवर कारवाई

राज्यात अनेक कीटकनाशके विक्री करण्यास बंदी आहे, असे असतानाही काही दुकानामधून या औषधांची विक्री करण्यात येते. त्यासाठी कृषि अधिकाऱयांना पथके तयार करुन तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तपासणीमध्ये बंदी असणारी कीटकनाशके विक्री केल्याचे आढळल्यास संबंधित दुकानावर थेट कारवाई करण्यात येईल. दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल, औषधांचा सर्व साठा जप्त करण्यात येईल असा इशाराही खोत यांनी दिला.

सेंद्रिय शेतीला चालना देणार

राज्यात सेंद्रिय शेतीला चालना देणार आहे. सेंदिय शेतीबाबात शेतकऱयांच्यामध्ये जनजागृती करण्यात येईल. शेतीचे महत्व पटवून देण्यात येईल. याशिवाय सें†िद्रय शेती करण्यास पुढे येणाऱया शेतकऱयांना मदतही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करत ना. खोत म्हणाले, नागरिकांनीही सेंद्रिय शेतीमालाचा वापर करावा. सेंद्रिय शेतमाल वापरण्याची मानसिकता करावी असे आवाहनही त्यांनी केले. सेंद्रिय शेतमाल विक्री करण्यासाठी प्रसंगी मनपा, नपा व ग्रामपंचायतींचे गाळेही शेतकऱयांना उपलब्ध करुन देण्याचा मानस असल्याचेही खोत यांनी यावेळी बोलताना सांगितले.

व्हिलेज, नॉलेज आणि कॉलेज उपक्रम राबविणार

राज्यात या वर्षीपासून व्हिलेज, नॉलेज आणि कॉलेज अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत कृषि महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी, कृषि विभागातील अधिकाऱयांच्याबरोबर शेतावर जातील. शेतकऱयांना कीड नियंत्रण, माती व पाणी परीक्षणासह शेतीच्या नियोजनाबद्दल मार्गदर्शन करतील. शेतकऱयांना माहिती देतील, त्यांच्या समस्या समजावून घेतील. यामुळे शेतकऱयांमध्ये उत्साह वाढेल असेही खोत यांनी सांगितले.