|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » जोगेश्वरीमध्ये इमारतीची संरक्षण भिंत कोसळल्याने सहा कारसह एका दुचाकीचे नुकसान

जोगेश्वरीमध्ये इमारतीची संरक्षण भिंत कोसळल्याने सहा कारसह एका दुचाकीचे नुकसान 

ऑनलाईन टीम / मुंबई :

जोगेश्वरी परिसरात इमारतीची संरक्षण भिंत कोसळली आहे. या झालेल्या दुर्घटनेत सहा कार आणि एका दुचाकीचे नुकसान झाले आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. मात्र या दुर्घटनेत कुणीही जखमी झालेले नाहीत.

काल सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे दोन इमारतींमध्ये असलेली ही संरक्षण भिंत कमकुवत झाली होती.त्यामुळे रहिवाशांनी खबरदारीचा उपाय म्हणून या भिंतीजवळील भाग रिकामा केला होता. अखेर रात्री ही भिंत कोसळली. या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र सहा कार आणि एका दुचाकीचे नुकसान झाले.