|Thursday, May 23, 2019
You are here: Home » Top News » नागपुरात जुगाराच्या अड्डय़ावरून सहा पोलिसांना पकडले

नागपुरात जुगाराच्या अड्डय़ावरून सहा पोलिसांना पकडले 

ऑनलाईन टीम / नागपूर :

पोलिसांनी सिव्हिल लाईन्स परिसरातील जुगार अड्डय़ावर छापा टाकला आहे. या छाप्यात बारा जणांना ताब्यात घेण्यात आले असून, धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये सहा पोलीस कर्मचाऱयांचाही समावेश आहे.

जुगार खेळताना पकडण्यात आलेले हे पोलीस कर्मचारी पोलीस मुख्यालय आणि शांतीनगर पोलीस स्टेशनमधील कर्मचारी आहेत. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये तीन सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आणि इतर तीन सरकारी विभागातील कर्मचाऱयांचाही यामध्ये समावेश आहे. सिव्हिल लाईन्स परिसरात विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ एक जुनी इमारत आहे. या इमारतीत हा जुगार अड्डा सुरू होता. मिळालेल्या माहितीनुसार, हे जुगार अड्डे चालवणारा देखील एक सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आहे. दरम्यान सर्व प्रकरणामुळे नागपूर पोलिसांची मान शरमेने खाली गेली आहे. तसेच नागपूर पोलिसांनी एक प्रसिद्धीपत्रकही जारी केले आहे. मात्र कोणतेही वरि÷ पोलीस अधिकारी याबद्दल बोलायला तयार नाही.

Related posts: