|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » घरावरील वीजवाहिन्या हटविण्यास विलंब

घरावरील वीजवाहिन्या हटविण्यास विलंब 

वार्ताहर / झरेबांबर:

साटेली-भेडशी येथील रामचंद पांगम यांच्या राहत्या घरावरून विद्युत वाहिनी गेल्याने त्यांना दुमजली इमारत बांधण्यास अडथळा होत आहे. त्यांनी साटेली-भेडशी येथील सहाय्यक अभियंता चराठे यांच्याकडे वारंवार अर्ज करूनही वीजवाहिन्या बदलून देण्याकडे दुर्लक्ष केल्याने पांगम यांनी वीज कंपनीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

साटेली-भेडशी येथील पांगम यांच्या घरावरून वीजवाहिन्या गेल्याने त्यांना दुमजली इमारत बांधण्यास अडथळा होत आहे. त्यामुळे या वीजवाहिन्या दुसरीकडून नेण्यासाठी पांगम यांनी वारंवार साटेली-भेडशी वीज कार्यालय सहाय्यक अभियंता चराठे यांच्याकडे गेली सात ते आठ वर्षे अर्ज करूनही त्यांच्या विनंतीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. त्यामुळे आपल्यासारख्या सामान्य माणसाने काय करायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. वीज वितरणच्या कारभाराबाबत पांगम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर अभियंता चराठे यांनी सदर प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले.