|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » दूध उत्पादक शेतकयांना मदतीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार

दूध उत्पादक शेतकयांना मदतीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार 

प्रतिनिधी/ सोलापूर

ऊस उत्पादक शेतकयांप्रमाणे दूध उत्पादक शेतकयांनाही मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिली.

अक्कलकोट येथे आज श्री स्वामी समर्थ वटवृक्ष कृषी आणि पशु पक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष शिवानंद पाटील, कृषी आणि पशुसंवर्धन समिती सभापती मल्लिकार्जुन पाटील, अक्कलकोटच्या नगराध्यक्षा शोभाताई खेडगी, गुलबर्गा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुवर्णा मल्लाजी, अर्थ, बांधकाम समिती सभापती विजयराज डोंगरे आदी उपस्थित होते. राज्य शासनाच्या कृषी विभाग, आत्मा आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शन सोमवारपर्यंत सुरु राहणार आहे.

खोत म्हणाले, “ऊस उत्पादकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने पॅकेज जाहिर केले आहे. ऊस उत्पादक शेतकयांना भाव मिळावा यासाठी साखरेचा विक्री दर निश्चित केला.  त्याचप्रमाणे दूध उत्पादकांना मदत देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे.  त्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे’’.

शेतमालाला भाव मिळावा यासाठी शेतकयांना अनुकुल ठरेल असे निर्यात धोरण राबवण्यावर केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.  त्यासाठी राज्य शासन राज्यातील शेतकयांच्या मागण्या केंद्र सरकारच्या दरबारी मांडत आहोत, असे  खोत यांनी सांगितले.

कृषी प्रदर्शनामुळे शेतकरी आणि उत्पादक यांच्यात दुवा तयार होतो. शेतकयांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख होते.  त्यांना नवीन माहिती मिळते यासाठी कृषी प्रदर्शन भरवणे आवश्यक आहे, असे श्री. खोत यांनी सांगितले.

यावेळी कृषी विभागाच्या वतीने प्रकाशीत करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रांतअधिकारी ज्योती पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, उपसंचालक रवींद्र माने, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, कृषी विकास अधिकारी बेंदगुडे आदी उपस्थित होते.

Related posts: