|Friday, March 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » तवंदी घाटात मिरचीचा ट्रक उलटला

तवंदी घाटात मिरचीचा ट्रक उलटला 

वार्ताहर/ तवंदी

चालकाचे नियंत्रण सुटल्याने मिरचीची वाहतूक करणारा ट्रक उलटल्याची घटना तवंदी घाटात शनिवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास घडली. या अपघात चालक व क्लिनर गंभीर जखमी झाले आहेत. तर वाहनाचे सुमारे चार लाखांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच हायवे पेट्रोलिंगच्या अधिकाऱयांनी घटनास्थळाला भेट देऊन उपाययोजना राबविल्या. घटनास्थळी शहर पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली.

चालक मंजुनाथ बसवंत हरपद (वय 27) व क्लिनर इरफान अहमद हलगे (वय 26, दोघे रा. शिलवंत सोमापूर, ता. शिगाव, जि. हावेरी) हे ट्रक क्रमांक केए 25 डी 4357 मधून मिरची भरुन जात होते. दरम्यान तवंदी घाटात आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रक विरोधी दिशेच्या दुभाजकावर आदळून पलटी झाला. त्यात मंजुनाथ व इरफान गंभीर जखमी झाले.

सदर अपघात शनिवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास घडला. त्यावेळी मार्गावरील वाहतूक कमी असल्याने अन्य वाहनांचे नुकसान अथवा जीवितहानी झालेली नाही. पण अपघातग्रस्त ट्रकच्या उजव्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात सुमारे 4 चार लाखांची हानी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पुँजलॉईडचे अधिकारी आण्णाप्पा खराडे व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळाला भेट देऊन मदत कार्य सुरू केले.

दरम्यान, कोल्हापूरहून गडहिंग्लजला रुग्णवाहिका जात होती. त्या रुग्णवाहिकेत जखमींवर प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती समजतात निपाणी शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Related posts: