|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » मुतालिक प्रकरणावरून राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल

मुतालिक प्रकरणावरून राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पत्रकार आणि विचारवंत गौरी लंकेश यांची तुलना कुत्र्याशी केल्याने श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक यांनी वाद आढवून घेतल्यानंतर आता त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. काँग्रेसनेदेखील त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. प्रमोद मुतालिक यांनी पत्रकार गौरी लंकेश यांच्याबाबत केलेले वक्त्व्यह घृणास्पद आणि लांछनास्पद आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच एवढेच नाही तर आता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी मूग गिळून गप्पच बसणार का? असाही प्रश्न काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विचारला आहे.

एवढेच नाही तर काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी ट्वटि करत हे वक्तव्य निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे. गौरी लंकेश यांच्या मृत्यूबाबत पंतप्रधान काहीही बोलत नाहीत. त्यानंतर आता प्रमोद मुतालिक यांनी लंकेश यांची तुलना कुत्र्याशी केली आहे त्यावरही पंतप्रधान शांतच बसले आहेत, म्हणजेच प्रमोद मुतालिक यांचे वक्तव्य पंतप्रधानांना मान्य आहे असे समजायचे का? असाही प्रश्न तिवारी यांनी विचारला आहे.ज्ये÷ पत्रकार आणि विचारवंत गौरी लंकेश आणि ज्ये÷ साहित्यकि कलबुर्गी यांच्या हत्यांबाबत पंतप्रधानांनी मौन बाळगले. त्यानंतर विरोधकांनी पंतप्रधानांवर टीका केली. मात्र श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी कर्नाटकात एखाद्या कुत्र्याचा मृत्यू झाला तर त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार कसे? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावरून देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.