|Monday, July 22, 2019
You are here: Home » Top News » मी खलनायक असेन तर उदयन राजे प्रेम चोप्रा-शिवेंद्रराजे भोसले

मी खलनायक असेन तर उदयन राजे प्रेम चोप्रा-शिवेंद्रराजे भोसले 

ऑनलाईन टीम / सातारा :

‘उदयनराजेंना कळून चुकले की, आता पूर्वीची परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे ते वैयक्तिक आरोप करत आहेत. ते मला खलनायक बोलले, ठिक आहे. मला खलनायकाची भूमिका का घ्यावी लागली? तुब्चे राजकारण हे प्रम चोप्रा सारखे आहे. शेवटी प्रेम चोप्राला उत्तर द्यायला हवे. मी अमोल पालेकरांची भूमिका घेऊ शकत नाही’ असे प्रत्त्यूत्तर साताऱयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले आहे.

‘कॉलर प्रत्येकाच्या शर्टला असते. कॉलर उडवायला अक्कल लागत नाही. तुम्ही कामाचे बोला. किती कामे झाली हे सांगा’, असा सवालही शिवेंद्रराजेंनी केला. मला लोकांसमोर जायला मी दाढी काढतो, मिश्या काढतो, भुवया काढतो असे डायलॉग मारायची गरज लागत नाही. अनेकवेळा ते घोषणा करतात की काम झाले नाही तर मिश्या काढेन, भुवया काढेन वगैरे, पण काहीच नाही, नुसती डायलॉगबाजी करत असतात. कोणाच्याही घरावर चालत होत असेल, तर कोणीही शांत बसत नाही. मग तो श्रीमंत असो, राजकारणी असो वा सर्वसामान्य तो शांत बसणार नाही. संघर्षाची ठिणगी तुम्ही टाकली आहे. जे काय असेल ते त्यांना सोसावे लागेल. ते नेहमी म्हणतात समोरासमोर या. आम्ही आलो होतो, तर तुम्ही का पळून गेला? पळपुटेपणा का दाखवला, असा सवालही यावेळी शिवेंद्रराजे यांनी केला.