|Saturday, March 23, 2019
You are here: Home » Top News » 20 रूपये जीवावर बेतले ; रिक्षाचालकाकडून प्रवाशाची हत्या

20 रूपये जीवावर बेतले ; रिक्षाचालकाकडून प्रवाशाची हत्या 

ऑनलाईन टीम / पुणे :

अवघ्या 20 रूपयाच्या वादातून रिक्षाचालकाने केलेल्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी पुण्यातील रविवार पेठेत ही घटना घडली आहे. तानाजी धोंडीराम कोरके असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे.

याप्रकरणी फरासखान पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अतुल उर्फ ईश्वर हराळेची रिक्षा ठरवली. तानाजी रविवार पेठ ते गणेश पेठ दरम्यान उतरले. रिक्षा भाडे 40 रूपये. तानाजींकडे देण्यासाठी वीसच रूपये होते. वीस नव्हते यातून वाद सुरू झाला. त्यावेळी आरोपीने साथीदाराच्या मदतीने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली त्यात तो बेशुद्ध झाला मात्र काही वेळांनी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला उपचारा आरोपीच्याच रिक्षातून घेऊन गेले. उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती नव्हती. तानाजी मूळचा लातूरचा रहिवासी होता. गेली आठ वर्षे कामानिमित्त पुण्यात राहत होता.

 

Related posts: