|Saturday, April 20, 2019
You are here: Home » उद्योग » 25 टक्के भारतीयांना उच्च आर्थिक घोटाळय़ांबरोबर सामना

25 टक्के भारतीयांना उच्च आर्थिक घोटाळय़ांबरोबर सामना 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील आर्थिक व्यवहार डिजिटल माध्यमातून करण्याचे प्रमाण वाढत आहे. ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना चार ग्राहकांपैकी एकाला फसवणुकीला सामोरे जावे लागत आहे. पैशांचे ऑनलाईन हस्तांतरण करताना 24 टक्के वापरकर्त्यांना गैरव्यवहाराचा अनुभव आला आहे, असे एक्स्परियन या जागतिक पातळीवरील आर्थिक माहिती क्षेत्रातील कंपनीने म्हटले.

दूरसंचारमध्ये सर्वाधिक 57 टक्के, बँकमध्ये 54 टक्के आणि रिटेलरमध्ये 46 टक्के घोटाळय़ांचे ग्राहक आहेत. 50 टक्के भारतीय आपल्याकडील माहिती बँकेला सहजपणे शेअर करतात, तर रिलेटर्सबरोबचे प्रमाण 30 टक्के आहे. मोबाईलच्या माध्यमातून व्यवहार करणे अधिक शक्य असल्याने 65 टक्के भारतीय या माध्यमाचा वापर करतात.

सेवा पुरविणाऱया कंपन्यांना 51 टक्के भारतीय वैयक्तिक माहिती देताना मोकळीक अनुभवतात. इलेक्ट्रॉनिक्स आणि ट्रव्हल सेवा देणाऱया कंपन्या सक्रीयपणे ग्राहकांची माहिती आणि ते भेट देत असणाऱया ठिकाणांची माहिती गोळा करतात. या क्षेत्रातही घोटाळा होण्याची जास्त शक्यता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. आशिया-पॅसिफिक क्षेत्रात भारतात सर्वाधिक डिजिटल सेवेचा वापर करण्यात येत आहे. 90 टक्के लोकांनी डिजिटल सेवेचा वापर करण्यात येत असल्याचे म्हटले. ग्राहकांची माहिती गोळा करत त्याचा वापर स्वतःचा व्यवसाय विस्तारण्यासाठी करण्यात येत असल्याचे म्हणण्यात आले.

Related posts: