|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » लोकहिताची कामे करणाऱया कार्यकर्त्यांची गरज

लोकहिताची कामे करणाऱया कार्यकर्त्यांची गरज 

प्रतिनिधी/ फलटण

रमजान ईदनिमित बादशाही मस्जिदचे चेअरमन सलीम शेख (वस्ताद) यांच्या पुढाकाराने ऐतिहासिक फलटण नगरीतील बादशाही मस्जिद (मर्कज) येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी शहरातील सर्व मुस्लीम बांधवाना शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, लोकहिताची कामे करणाऱया कार्यकर्त्यांची आजही समाजाला गरज आहे. शिक्षण प्रक्रियेदरम्यान समाजातील मुलांना काही अडचणी आल्यास कार्यकर्त्यांनी आपणास सांगाव्यात त्याचे निरसन करण्याचे आश्वासन दिले.  यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांची जैन सोशल क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सलीम शेख यांच्या हस्ते सत्करा करण्यात आला.

 कार्यक्रमास डॉ. जे. टी. पोळ, रहीमान पटेल, रफीक शिराळकर, हनिफ शेख, नजीर शेख, नगरसेवक किशोर सिंह निंबाळ्कर, अजय माळ्वे, असिफ मेटकरी, पत्रकार सुभाष भांबुरे यांच्यासह शहरातील हिंदू-मुस्लिम बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.