|Monday, April 22, 2019
You are here: Home » Top News » महाप्रसादातून विषबाधा, सात जणांचा मृत्यू

महाप्रसादातून विषबाधा, सात जणांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / रायगड :

रायगडातील महडमध्ये पूजेच्या महाप्रसादातून 80 जणांना विषबाधा झाल्याचा होवून तीन चिमुरडय़ांसह चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे.

खालापूर तालुक्मयातील महडमध्ये माळी कुटुंबाच्या घरी सोमवारी वास्तूशांतीचा कार्यक्रम होता. पूजेनंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर घरी परतलेल्या नातेवाईकांना रात्री उशिरा उलटी आणि मळमळण्याचा त्रास झाला. जवळपास 80 जणांना विषबाधा झाल्याची माहिती असून सुरूवातीला सर्वांना खोपोलीतील रूग्णालयात नेण्यात आले. त्यापैकी 25 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर नवी मुंबई आणि पनवेलमधील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत दुर्दैवाने तीन लहान मुलांसह चौघा जणांचा मृत्यू झाला आहे.

Related posts: