|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » आठव्या पुणे लघुपट महोत्सवात ‘लाल वाली’ ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट

आठव्या पुणे लघुपट महोत्सवात ‘लाल वाली’ ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट 

ऑनलाईन टीम / पुणे :

आठव्या पुणे लघुपट महोत्सवात  ‘लाल वाली’ या लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपट आणि दिग्दर्शनाचे दुसरे पारितोषिक पटकावून छाप पाडली, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक ‘गोंदण विठुरायाचे’ लघुपटासाठी दिनेश आखाडे यांना मिळाले तर याच लघुपटला लघुपटाचा दुसरे पारितोषिक मिळाले. 
नलिनोत्तम, ए. के फिल्म्स आणि मराठी चित्रपट परिवारतर्पेâ आयोजित महोत्सवात ऑस्कर अ‍ॅवॅâडमीचे सदस्य उज्वल निरगुडकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज रोजभोसले, निर्माते अनिल काकडे, वैभव जोशी, फिल्म पेâडरेशन ऑफ इंडियाचे संचालक विकास पाटील, चित्रपट महामंडळाचे खजिनदार संजय ठुबे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. पंढरपूर वारीवर आधारीत ‘गोंदण विठुरायाचे’ या लघुपटाच्या छायांकनासाठी चिन्मय भारव्दाज यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रणासाठी पारितोषिक मिळाले. ‘बूट’ या लघुपटासाठी अमित काळे यांना संकलनाचे पारितोषिक मिळाले तर कलकत्ता येथील नेहा शर्मा यांना ‘इन सर्च ऑफ लाईफ’ लघुपटासाठी पटकथेचे पारितोषिक पटकाविले. ‘आजा सय्या’ लघुपट सर्वोत्कृष्ट म्युझिक व्हिडीओ ठरला, तर ‘अ व्हायलंट ड्रिम’ या लघुपटाने सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेशनपटाचे पारितोषिक मिळाविले. ‘स्टेअरकेस’ लघुपटाला सर्वोत्कृष्ट संकल्पनेचे पारितोषिक मिळाले. ठाणे येथील पुस्तक विव्रेâत्यावर आधारीत ‘झेन अ‍ॅन्ड दि आर्ट ऑफ बुकसेलिंग’ लघुपटाला सर्वोत्कृष्ट रलघुपटाचे पारितोषिक मिळाले, तर ‘कॉफी कॉफी’ या लघुपटासाठी सोहम पाठक यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले.