|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » गावाकडच्या गोष्टीच्या कलाकारांचे असेही दातृत्व उपक्रम

गावाकडच्या गोष्टीच्या कलाकारांचे असेही दातृत्व उपक्रम 

प्रतिनिधी/सातारा

सध्या यु टुबवरील वेब मालिकांचा धिंगाणा सुरु झाला आहे. उठसुठ कोणीही कशाही मालिका काढू लागलेत. त्याचा तारत्मही वा धरबोळ नाही. संस्कृती बिघडवण्याचा काही वेब मालिकांनी ठेकाच जणू घेतला आहे. परंतु सातारा जिह्यात कोरी पाटी प्रॉडक्शनच्या निर्माते नितीन पवार व कलाकारांनी या सगळय़ांना फाटा देत सामाजिक दातृत्व ठेवून अनेक सामाजिक कामे हाती घेतली आहेत. डोंगरावरती वसलेली पाटण तालुक्यातील वरची केळेवाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू भेट देवून इतर वेब मालिका निर्माते व कलाकारांच्या डोळय़ात झणझणीत अंजनच घातले आहे.

सातारा जिह्यात अनेक निर्माते आणि कलाकार होवू लागले आहेत. कोणीही कशाही मालिका काढू लागले अन् यु टुबवर टाकत आहेत. त्या मालिकांना सेन्सरशीप लावण्याचा प्रश्न येत नाही. संस्कृती आणि इतर बाबींना फाटा देत या मालिका निर्माते आणि लेखक पिढी बिघडवण्याचे काम करु लागले आहेत. सध्या युवा पिढीच्या हातात स्मार्ट फोन असल्याने या बेव मालिका लगेच यु टुबवर सुरु होतात. विशेष म्हणजे या मालिकांमध्ये एकच विषय घेतला जाता आहे. तो म्हणजे बिघडत चाललेली महाविद्यालयीन तरुणतरुणी. त्यामुळे हे आणखीच बिघडण्याची शक्यता आहे. अशा मालिकांनाही सेन्सारशीप असणे गरजेचे बनले आहे. सातारा जिह्यातील तरुण कलाकारांनी एकत्र येवून कोरी पाटी प्रोडक्शन सुरु केले आहे. त्या अंतर्गत गावाकडच्या गोष्टी ही वेब मालिका सुरु असून या मालिकेतील कलाकारांनी स्वखर्चाने वरची केळेवाडी येथील 1 ली ते 7 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश तसेच संपूर्ण साहित्याचे किट वाटप करण्यात आले. केवळ बोलून न दाखवता प्रत्यक्षाच सामाजिक कार्य केले आहे.

अशा वेब मालिकांना सेन्सारशीप हवी

अलिकडे ग्रामीण भागातील युवतींनाही सिनेमात कामे मिळवून देतो अशी भुरळ घालून फसवणुकीचे प्रकार घडू लागले आहेत. अशातूनही वेब मालिकांमध्ये चुकीच्या पद्धतीने काही सिनमे दाखवले जातात. ही मालिका चित्रीत करताना ते सिन्स कट केले जात नाहीत. चित्रपटामध्ये असे सिन्स कट करण्यासाठी सेन्सारशीप असते. येथे मात्र सेन्सॉरशीप नसल्याने वेब मालिकांमध्ये काहीही दाखवले जात असल्याचा आपेक्ष सर्वसामान्यांमधून होवू लागला आहे.