|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » Top News » डीएसकेप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षांसह सहा जणांना अटक

डीएसकेप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षांसह सहा जणांना अटक 

ऑनलाईन टीम / पुणे   :

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्र समोरील अडचणीत वाढ होताना दिसत आहे. डीएसके यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यासह चार बड्या अधिकाऱयांना तसेच डीएसकेंचे सीए आणि अभियंत्यांनाही आर्थिक गुन्हे शाखेने आज (बुधवार) अटक केली आहे.

प्रथम त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, डीएसके यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यालाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. गुंतवणूकदारांचे पैसे आणि बँकांचे कर्ज थकवल्याप्रकरणी डी.एस.कुलकर्णी सध्या कारागृहात आहेत. पुणे आर्थिक गुन्हे शाखेला बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱयांनी नियमबाह्य कर्ज दिल्याचा संशय आहे. त्यामुळे त्यांनी चौकशीसाठी मराठे यांच्यासह काही अधिकाऱयांना बोलावले होते. यात आणखी काही अधिकाऱयांची नावे समोर येण्याची शक्मयता आहे. मराठे यांच्यासह बँकेचे कार्यकारी संचालक राजेंद्र गुप्ता, डीएसकेंचे सीए सुनील घाटपांडे, अभियंता राजीव नवासकर यांना पुण्याहून तर बँक ऑफ महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष सुशील मुनहोत यांना जयपूर तर अहमदाबाद येथे बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांना अटक करण्यात आली आहे.