|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » गोव्याला जाताना कार कालव्यात पडून तिघांचा मृत्यू

गोव्याला जाताना कार कालव्यात पडून तिघांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / पंढरपूर 

गोव्याला फिरायला निघालेल्या जळगाव जिह्यातलि तीन युवकांवर काळाने घाला घातला आहे. अहमदनगर -करमाळा रस्तयावरील अपूर्ण कामामुळे कार काल्यात कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

तिघंही जण जळगाव जिह्यातील जामनेर तालुक्मयातल्या इस्लामपूरचे रहिवासी होते.फारुख शेख, फरहान खान आणि सहरीन शेख हे तिघे बोलेरो कारने, तर त्यांचे इतर मित्र दुसऱया गाडीने गोव्याला जायला निघाले होते. मात्र गोव्यात पोहचण्यापूर्वीच त्यांना मृत्यूने गाठलं. करमाळा-टेंभूर्णी रस्त्यावर कुंभेज गावाजवळ असताना पहाटे त्यांची कार कालव्यात पडली.

नगर-करमाळा रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम अपूर्ण आहे. या ठिकाणी कोणताही माहिती फलक नाही. यामुळेच हा अपघात झाल्याची शक्मयता वर्तवली जात आहे. यापूर्वी शंभरहून अधिक प्रवाशांचा याच अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे अपघाती मृत्यू झाला आहे.