|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » Oppo find X लॉन्च

Oppo find X लॉन्च 

 ऑनलाईन टीम / मुंबई

गेल्या अनेक दिवसांपासून लॉन्च होण्याच्या प्रतिक्षेत असलेला Oppo Find X हा फोन अखेर लॉन्च झाला आहे. या फोनमध्ये मोटोराइज्ड कॅमेरा स्लायडर जो आपोआप पॉप-अप होतो असे फिचर्स देण्यात आले आहेत. Oppo Find X या फोनचा स्लायडर 3 लाख वेळा तपासला असल्याचा दावा करण्यात आला आहे. पाहूयात या फोनचे इतर फिचर्स आणि किंमत. Oppo Find X या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर, 8GB रॅम आणि 3D फेशियल स्कॅनिंग देण्यात आला आहे. 

Oppo ने आपल्या Find X या फोनची किंमत 999 यूरो (जवळपास 79,000 रुपये) ठेवली आहे. हा फोन ऑगस्ट महिन्यात उपलब्ध होणार आहे. भारतात या फोनची किंमत आणि उपलब्धतेची माहिती 12 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. यासोबतच Oppo Find X चा लिमिटेड लॅम्बर्गिनी एडिशनही आहे ज्यामध्ये 512 GB स्टोरेज देण्यात आला आहे. कार्बन फायबर बँक सुपर वीओओसी फ्लॅश चार्जची सुविधा असलेल्या या फोनची किंमत 1,699 यूरो (1,34,400 रुपये) आहे.