|Thursday, April 18, 2019
You are here: Home » Top News » येत्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली लढणार : प्रकाश आंबेडकर

येत्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली लढणार : प्रकाश आंबेडकर 

 पुणे / प्रतिनिधी :

भाजपविरोधी सर्व पक्षांनी येणाऱया निवडणुकीत एकत्र यावे. मात्र, लोकसभेच्या प्रत्येकी दोन जागा धनगर, माळी, भटक्या विमुक्तांसह मुस्लिमांना देण्यात येणार असतील, तरच आम्ही आघाडीत एकत्र येण्यास तयार आहोत, अशी भूमिका ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत मांडली. आगामी निवडणुका आम्ही वंचित बहुजन आघाडी या बॅनरखाली लढणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, पुरोगामी पक्ष म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीला आमचा विरोध नाही. परंतु आमच्या काही अटी आहेत. त्या मान्य केल्या, तर आम्ही एकत्र येऊ शकतो. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. त्या माध्यामातून राज्यातील वंचित संघटनांना यात सहभागी करून आगामी काळात काम करण्यात येणार आहे. येणाऱया 27 तारखेपासून राज्यातील प्रत्येक जिह्यात जाणार आहे. भाजप सरकारविरोधात जनतेच्या मनात प्रचंड रोष असून, जनता पर्याय म्हणून काँग्रेसकडे पाहत आहे. मात्र, एकहाती कारभाराला जनता स्वीकारणार नाही.

 

 

 

 

Related posts: