|Sunday, November 18, 2018
You are here: Home » Top News » डीएसके गैरव्यवहार प्रकरण : महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष रवींद्र मराठे ससूनमध्ये दाखल

डीएसके गैरव्यवहार प्रकरण : महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष रवींद्र मराठे ससूनमध्ये दाखल 

ऑनलाईन टीम / पुणे :

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी अटकेत असलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना मध्यरात्री अचानक त्रास जाणवू लागल्याने ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मराठे यांच्यासह सहा जणांना बुधवारी अटक करण्यात आले होते. न्यायालयासमोर उभा केले असता त्यांना 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठीत असताना त्यांना मध्यरात्री त्रास जाणवत होता.

 

डी एस कुलकर्णींना अधिकाराचा गैरवापर करून मोठय़प्रमाणात कर्ज दिल्याचा आर्थिक गुन्हे शाखेला संशय आहे. त्यामुळे रवींद्र मराठे यांच्यासह बँकेचे चार अधिकारी, डीएसकेंचे चार्टड अकाऊंटंट आणि अभियंत्याला पुणे शहर पोलीस आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

 

 

 

Related posts: