|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » दुधीचा रस प्यायाल्याने महिलेचा मृत्यू

दुधीचा रस प्यायाल्याने महिलेचा मृत्यू 

ऑनलाईन टीम /  पुणे :

पुण्यात एका 41 वर्षांच्या महिलेचा दुधी भोपाळय़ाचा रस प्यायाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

फिटनेसबाबत सजग असणारी ही महिला नियमित व्यायाम करायची. 12 जून रोची सकाळी ती नेहमीप्रमाणे चालायला गेली. साडेनऊच्या सुमारास ती घरी परतली. ऑफीसला जाण्यापूर्वी ती दुध रस प्यायली. कारमधून ऑफीसला जात असताना तीला उलटय़ा झाल्या. ती तातडीनं घरी परतली. थोड्याच वेळात तिला श्वसनाचा आणि पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. अस्वस्थ वाटू लागल्यानं दुपारी दीडच्या सुमारास तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं उपचार सुरू असतानाच तिला हृदयविकाराचा झटका आला. पुढील दोन दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. या दरम्यान तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, अशी माहिती तिच्या नातेवाईकानं दिली.रस प्यायल्यानंतर अर्धा तास तिला उलट्या झाल्या. पुढील तीन दिवसांत तिची प्रकृती खूपच खालावली. 16 जूनला मध्यरात्री तिचा मृत्यू झाला, अशी माहितीही त्यांनी दिली.