|Saturday, May 25, 2019
You are here: Home » क्रिडा » बीसीसीआयकडून क्रिकेटपटूंना मानधन देण्यास मंजुरी

बीसीसीआयकडून क्रिकेटपटूंना मानधन देण्यास मंजुरी 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय क्रिकेटपटूंच्या मध्यवर्ती करारानुसार देण्यात येणाऱया मानधनाला अखेर भारतीय क्रिकेट मंडळाने मंजुरी दिली आहे. शुक्रवारी भारतीय क्रिकेट मंडळाच्या खास बोलाविण्यात आलेल्या सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱयावर जाणार आहे. भारतीय संघाचा हा दौरा तब्बल अडीच महिन्यांचा असून या दौऱयापूर्वीच भारतीय क्रिकेट मंडळाने वरील महत्त्वाचा निर्णय घेवून साशंकतेच्या सावटावर पडदा टाकला. 7 मार्च रोजी भारतीय क्रिकेटपटूंच्या मध्यवर्ती कराराची सुधारणा करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या प्रशासकीय समितीने दिला होता पण मंडळाचे सचिव अमिताभ चौधरी यांनी या प्रस्तावावर आपली स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. भारतीय क्रिकेट मंडळाच्या सलग्न असलेल्या विविध राज्यस्तरीय 28 क्रिकेट संघटनांच्या प्रतिनिधींना सर्वसाधारण बैठकीसाठी बोलावण्याची आवश्यकता असल्याचे चौधरी यांनी म्हटले होते. इंग्लंडच्या दौऱयावर रवाना होण्यापूर्वी मध्यवर्ती करार मानधनाचा निर्णय झाल्याने क्रिकेटपटूंमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. या नव्या करारानुसार ‘ए+’ दर्जाच्या गटातील क्रिकेटपटूला प्रत्येकवर्षी 7 कोटी रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे तर ए, बी, सी दर्जा गटातील प्रत्येक क्रिकेटपटूला वार्षिक अनुक्रमे 5 कोटी, 3 कोटी, 1 कोटी रुपये देण्यात येतील. त्याचप्रमाणे राष्ट्रीय पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंच्या मानधनातही वाढ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला

Related posts: