|Saturday, February 16, 2019
You are here: Home » क्रिडा » पूर्ण तंदुरुस्तीनंतर इंग्लंड दौऱयास सज्ज

पूर्ण तंदुरुस्तीनंतर इंग्लंड दौऱयास सज्ज 

दौऱयावर रवाना होण्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीचे प्रतिपादन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय कर्णधार विराट कोहलीने त्याच्या फिटनेसबाबत असालेल्या सर्व शंका दूर केल्या असून आयपीएलमध्ये खेळताना झालेल्या दुखापतीतून आपण पूर्णपणे तंदुरुस्त झालो असल्याचे त्याने इंग्लंड दौऱयावर प्रयाण करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेशत सांगितले. या दुखापतीमुळे मिळालेल्या ब्रेकनश इंग्लंड दौऱयाच्या तयारीसाठी भरपूर वेळ मिळाल्याचेही त्याने सांगितले.

‘मी शंभर टक्के तंदुरुस्त असून मानेच्या दुखापतीतून मी पूर्णपणे सावरलो आहे. आता मानेचा कोणताही त्रास होत नाही. मुंबईमध्ये सहा ते सात सत्रांचा सराव केल्यानंतर मी आता इंग्लंड दौऱयासाठी सज्ज झालो आहे. याशिवाय तंदुरुस्ती चाचणीलाही मी सामोरे गेलो असून कोणताही त्रास जाणवत नाही. खरे सांगायचे तर मी प्रत्यक्ष मैदानात उतरण्यास आतुर झालो आहे. सतत क्रिकेट खेळत असूनही अशा भावना मनात येणे हे खरे तर दुर्मीळच असते. छोटे ब्रेक्स खूपच मोलाचे ठरतात. ताजेतवाने झाल्यामुळे पुन्हा मैदानात उतरण्यास उत्साह निर्माण होतो,’ अशा भावना कोहलीने व्यक्त केल्या.

‘इंग्लंडमध्ये आम्ही क्षमतेनुसार खेळ केलेला नाही. तेथील सतत बदलणारे वातावरण विदेशी खेळाडूंना आव्हानात्मकच असते. त्याचा अनुभव मिळण्यासाठी कौंटीमध्ये जाण्याचा विचार केला होता. पण दुखापतीमुळे तेथे जाता आले नाही. मात्र ब्रेकमुळे पूर्ण तंदुरुस्त होता आले आणि रिफ्रेशही होता आले. दीर्घ दौऱयासाठी या गोष्टी आवश्यक असतात,’ असेही तो म्हणाला. पत्रकार परिषदेला प्रशिक्षक रवि शास्त्रीही उपस्थित होते.

दोन महिन्यांच्या इंग्लंड दौऱयात भारतीय संघ 5 कसोटी, 3 वनडे, 3  टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. 2002 नंतर प्रथमच भारतीय संघ या दौऱयात कसोटीआधी मर्यादित षटकांच्या मालिका खेळणार आहे. आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-20 सामन्याने त्याची सुरुवात येत्या बुधवारपासून होणार आहे. मागील दौऱयात भारताने इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका 3-2 अशा फरकाने जिंकली होती. पण यावेळी इंग्लंड संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने टीम इंडियाला कडवा प्रतिकार होण्याची शक्मयता आहे. सध्या त्यांनी वनडे मालिकेत ऑस्टेलियावर 4-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे.

Related posts: