|Monday, November 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तिसऱया मजल्यावरून उडी मारून रूग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न

तिसऱया मजल्यावरून उडी मारून रूग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न 

प्रतिनिधी/ सांगली

 उपचारानंतर डिस्चार्ज देण्याच्या दिवशीच रूग्णाने वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयाच्या तिसऱया मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये रूग्णाचा पाय मोडला असून डोक्यालाही गंभीर इजा झाली आहे. बेशुध्दावस्थेत त्याच्यावर  अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी सकाळी अचानक घडलेल्या या प्रकाराने वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात एकच खळबळ उडाली.

 अनिल केशव माने (वय 55 रा. आप्पासाहेब पाटील नगर, शंभर फुटी रोड) असे जखमी रूग्णाचे नाव आहे. याबाबत पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अनिल माने याला दारूचे व्यसन आहे. लिव्हर आणि अन्य आजारांनी ते त्रस्त असल्याने मुलाने 17 जून रोजी त्याला वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात दाखल केले होते. रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक 63 मध्ये उपचार संपल्यानंतर शुक्रवारी त्यांना डिस्चार्ज करण्यात येणार होते. सकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांकडून मुलगा माहिती घेत होता. अनिल माने यांच्या पोटात अजूनही संसर्ग असल्याने किरकोळ शस्त्रक्रियेने काही दिवसानंतर उपचार करू अशी माहिती डॉक्टर माने यांच्या मुलाला सांगत होते.

 ही माहिती मानेंनी ऐकली आणि थेट रूग्णालयाच्या तिसऱया मजल्यावर जावून कोणाला काही समजण्यापूर्वी उडी घेतली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच पळापळ सुरू झाली. रूग्णालयातील कर्मचारी आणि अन्य रूग्णांच्या नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तिसऱया मजल्यावरून उडी मारल्याने माने यांचा एक पाय मोडला आहे. शिवाय डोके आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. बेशुध्दावस्थेत त्याला रूग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसात नोंद झाली नव्हती.

Related posts: