|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » नंदुरबारमध्ये शाळेच्या इमारतीवर वीज कोसळली

नंदुरबारमध्ये शाळेच्या इमारतीवर वीज कोसळली 

ऑनलाईन टीम / नंदुरबार :

नवापूर तालुक्यातील शाळेच्या इमारतीवर वीज कोसळल्याची घटना घडली आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. डी.जे. अग्रवाल इंग्लिश मीडियम स्कूल असे या शाळेचे नाव आहे.

 

वीज कोसळली त्यावेळी शाळेत जवळपास 500 विद्यार्थी उपस्थित होते, अशी माहिती मिळते आहे. हे सर्व विद्यार्थी सुखरुप आहेतविद्यार्थी उपस्थित असताना वीज कोसळल्याने सगळय़ांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. मात्र सुदैवाने सर्वजण सुखरुप आहेत. मात्र या घटनेनंतर शाळेत सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नवापूर शहरासह तालुक्मयातील चिंचपाडा, विसरवाडी परिसरात विजेचा कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे.