|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » Top News » ‘ऑपरेशन ऑल आऊट 2’ :हे टॉप 9 दहशतवादी हिटलिस्टवर

‘ऑपरेशन ऑल आऊट 2’ :हे टॉप 9 दहशतवादी हिटलिस्टवर 

ऑनलाईन टीम/ श्रीनगर :

जम्मू- काश्मीरमध्ये शुक्रवारी सुरक्षा दलांनी आयसिसच्या जम्मू- काश्मीरमधील म्होरक्मयासह चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. जम्मू- काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यावरची ही पहिलीच मोठी चकमक होती. केंद्र सरकारने जम्मू- काश्मीरमधील दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतली असून आगामी काळात लष्करी कारवाया वाढण्याची चिन्हे आहेत.

सुरक्षा दलांनी जम्मू- काश्मीरमधील टॉप 21 दहशतवाद्यांची यादीच तयार केली असून आगामी काळात या दहशतवाद्यांना टार्गेट केले जाणार आहे. यामध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनचे 11, लष्कर – ए- तोयबाचे सात, जैश- ए- मोहम्मदचे दोन आणि अल-कायदाची जम्मूतील संघटना अन्सार गजवत उल हिंद या संघटनेच्या एका दहशतवाद्याचा समावेश आहे. या 21 मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांना खsणीत ठेवण्यात आले आहे. या दहशतवाद्यांवर 12 लाखांचे इनाम आहे.

 

Related posts: